प्रकरण ३
५,२८० फुटांवरची पहिली सकाळ
थकवा, शांतता आणि वाढदिवसाचा बेत
२७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२६
पहाटेची निरव शांतता
२७ ऑगस्ट. सकाळी नेहमीप्रमाणे साडेसहाला जाग आली. बाहेर डोकावून पाहिलं तर वातावरण इतकं स्वच्छ, सुंदर आणि अप्रतिम होतं की फिरायला जाण्याचा मोह आवरलाच नाही. रस्त्यावर एकही माणूस नाही, सगळीकडे निरव शांतता!
मुलगा "नको, जाऊ नका" म्हणत असतानाही मी फिरायला गेलो. आणि दोनच दिवसांत कळलं, तो का नको म्हणत होता!
डेन्व्हर ५,२८० फूट उंचीवर आहे. इथे ऑक्सिजनची पातळी कमी असल्यामुळे मला फारच थकवा जाणवू लागला. विश्रांती घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही, आणि चार दिवस असेच गेले.
वाढदिवसाचा बेत
प्रज्ञाचा वाढदिवस १० सप्टेंबरला होता. म्हणून मुलाने एका हॉटेलचं बुकिंग करून ठेवलं होतं; तिथेच मोठा वाढदिवस साजरा करायचं ठरलं होतं. पण माझी प्रकृती आणि प्रज्ञाचं गुडघेदुखी, या दोन्हींमुळे तो कार्यक्रम रद्द करण्याशिवाय पर्याय उरला नाही. 😀
म्हणूनच म्हणतो, आपलं आरोग्य उत्तम असणं फार महत्त्वाचं! 🌹
मोठ्या पडद्यावर
हॉटेलमधला बेत जरी रद्द झाला होता, तरी माझ्या आणि प्रज्ञाच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही AMC Arapahoe Crossing 16 मधल्या IMAX मध्ये "हनुमान अंश" (Hanuman Ansh) हा सिनेमा बघायला गेलो.
ढगाळ दिवस
१३ सप्टेंबरपर्यंतचे दिवस असे मजेत निघून गेले. १४ तारखेपासून मात्र वातावरण ढगाळ आणि कोरडं झालं; थंड वारे वाहू लागले. त्यामुळे आम्ही घरीच राहणं योग्य समजलं.