डेन्व्हर विमानतळावर बॅगेज बेल्टजवळ सुजीत, बाबा आणि आई यांचा आनंदी सेल्फी

एका वडिलांचा डेन्व्हर प्रवास, २०२६

मी पाहिलेली अमेरिका

शरद हिरेमठ

वाचायला सुरुवात करा

मनोगत

तसं पाहायला गेलं तर आजकाल अमेरिकेला जाणं म्हणजे काही विशेष राहिलेलं नाही. १९८० च्या आधी तिथे जाणं म्हणजे थोडं खास होतं; आज मात्र अमेरिकेत नोंदणी असलेले ५५ ते ६० लाख भारतीय राहत आहेत. असो.

मला जशी अमेरिका भावली, तशी ती शब्दांत मांडण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. 🙏

प्रकाशकाची टीप

हे लेखन माझ्या वडिलांचं आहे.

२६ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबर २०२६ या काळात माझे आई-वडील भारतातून माझ्याकडे अमेरिकेत, कोलोरॅडो राज्यातल्या डेन्व्हर परिसरात, राहायला आले होते. सात वर्षांनंतर आम्ही एकमेकांना भेटत होतो. त्या सहा आठवड्यांत बाबांनी जे जे पाहिलं, अनुभवलं आणि जे मनाला भावलं, ते त्यांनी स्वतःच्या शब्दांत लिहून ठेवलं. त्यांचे हे शब्द माझ्यासाठी अनमोल आहेत.

हे केवळ प्रवासवर्णन नाही; ही माझ्या वडिलांची नजर आहे, आणि ती आमच्या कुटुंबासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवण्यासाठीच हे संकेतस्थळ.

त्यांचं मूळ लेखन जसंच्या तसं सुरक्षित ठेवलं आहे. इथल्या आवृत्तीत फक्त क्रम, भाषा आणि मांडणी थोडी सुबक केली आहे, आशय, अनुभव आणि त्यांचा स्वतःचा सूर कायम ठेवून. फोटो आणि व्हिडिओ त्या त्या प्रसंगांसोबत जोडले आहेत.

प्रवासाची वाट

  1. चष्मा घरीच राहिला!

    हडपसरमधला निरोप, मध्यरात्रीचा मुंबईचा प्रवास आणि इस्तंबूलच्या वाटेवरची 'चव बदललेली' न्याहारी.

  2. सात वर्षांनंतरची भेट

    इस्तंबूलचं अफाट विमानतळ, चौदा तासांचा प्रवास आणि डेन्व्हरच्या विमानतळावरचा पुष्पगुच्छ.

  3. ५,२८० फुटांवरची पहिली सकाळ

    निरव शांतता, उंचीमुळे आलेला थकवा, रद्द झालेला वाढदिवसाचा बेत आणि मोठा पडदा.

सर्व प्रकरणे →

निवडक छायाचित्रे

कॅसल रॉक येथील डोंगरावर बांधलेले सुंदर हिंदू मंदिर, पायऱ्या आणि निळे आकाशपार्क मीडोज मॉलच्या बाहेरील टेबलावर गप्पा मारत बसलेले बाबा आणि आई